पर्लकोटा पुलावरील पाेकलॅन मशीन जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:36 IST2021-03-19T04:36:02+5:302021-03-19T04:36:02+5:30

पर्लकाेटा नदीच्या कामाला मागील महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. या कामावर जवळपास आठ जेसीबी व पाेकलॅन मशीन लावण्यात आल्या आहेत. ...

The Paeklan machine on the Pearlkota bridge burned down | पर्लकोटा पुलावरील पाेकलॅन मशीन जाळले

पर्लकोटा पुलावरील पाेकलॅन मशीन जाळले

पर्लकाेटा नदीच्या कामाला मागील महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. या कामावर जवळपास आठ जेसीबी व पाेकलॅन मशीन लावण्यात आल्या आहेत. दिवसभर काम केल्यानंतर या मशीन त्याच ठिकाणी ठेवल्या जातात. त्या ठिकाणी चाैकीदाराचीही नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री घटना घडली त्यावेळी चाैकीदार किनाऱ्यावर असलेल्या कॅम्पमध्ये पाणी पिण्यासाठी गेला हाेता. त्याच सुमारास अज्ञात व्यक्तीने पाेकलॅन मशीनला आग लावली.

यासंदर्भात कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी भामरागड पोलीस स्टेशनला घटनेची तक्रार दाखल केले आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारले असता आग कोणी लावली हे पोलीस तपासातून स्पष्ट होईलच. नक्षलवाद्यांचे हे कृत्य नसावे. कारण नक्षलवादी असते तर ते त्या ठिकाणी असलेल्या इतरही जेसीबी व पाेकलॅनला आग लावली असती तसेच त्या ठिकाणी नक्षल पत्रकेही टाकली असती असा अंदाज व्यक्त केला आहे. आग लावणाऱ्याचा शाेध पाेलीस घेत आहेत.

Web Title: The Paeklan machine on the Pearlkota bridge burned down