मळणीदरम्यान धान पुंजण्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:25 IST2017-12-16T00:24:50+5:302017-12-16T00:25:03+5:30
शेतामध्ये यंत्राच्या सहाय्याने धान मळणी करीत असताना अचानक लागलेल्या आगीत धान, ट्रॅक्टर, मळणी यंत्र जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गडचिरोली येथीलङ्कमोहन संगनवार यांच्या येवली-गोविंदपूर गावानजीकच्या शेतात घडली.

मळणीदरम्यान धान पुंजण्याला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतामध्ये यंत्राच्या सहाय्याने धान मळणी करीत असताना अचानक लागलेल्या आगीत धान, ट्रॅक्टर, मळणी यंत्र जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गडचिरोली येथीलङ्कमोहन संगनवार यांच्या येवली-गोविंदपूर गावानजीकच्या शेतात घडली. या घटनेत जळालेल्या मालाची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे.
मोहन संगनवार यांची शेतजमीन येवलीनजीक गोविंदपूर येथे आहे. कापणीनंतर पुंजने टाकण्यात आले होते. दरम्यान गुरूवारी यंत्राद्वारे धानाची मळणी करताना पुंजण्याला अचानक आग लागली. यात तीन लाख रूपये किमतीचे धान जळून खाक झाले.
तसेच मळणी यंत्र व ट्रॅक्टरला सुध्दा आग लागली. सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी गडचिरोलीच्या अग्नीशमन दलाला दिली.
मात्र अग्नीशमन यंत्र वेळेवर पोहोचले नाही. त्यानंतर गोविंदपूरच्या एका नागरिकाने स्वत: गडचिरोलीला जाऊन ही माहिती दिली. अग्नीशमन यंत्रणा सायंकाळी ६ वाजता घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेने संगनवार यांचे १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.