शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

चार कोटींचा धान घोटाळा, उपप्रादेशिक व्यवस्थापकासह संस्था पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By संजय तिपाले | Updated: April 19, 2025 12:59 IST

'लोकमत'च्या पाठपुराव्याला यश : दोन वर्षांतील गैरव्यवहाराची एकत्रित फिर्याद, आरोपी फरार

संजय तिपाले / गडचिरोलीगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बहुचर्चित धान खरेदी घोटाळ्यात अखेर १९ रोजी पहाटे कुरखेडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस. बावणे यांच्यासह विपणन अधिकारी, संस्था पदाधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 'लोकमत'ने सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरले होते. दोन वर्षांत केलेल्या गैरव्यवहाराची एकत्रित फिर्याद नोंदविण्यात आली असून कुणकुण लागताच आरोपी फरार झाले आहेत. देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये मिळून तब्बल दहा हजार क्विंटलची तफावत आढळली होती. शिवाय बारदान्यामध्ये अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दोन्ही वर्षांत एकूण ३ कोटी ९५ लाख रुपयांचा गैरव्यवहार समोर आलेला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दोन्ही वर्षांतील गैरव्यवहार प्रकरणात  गुन्हा नोंदवून संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा व त्या मालमत्तेचा लिलाव करुन त्यातून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र,    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आठ दिवस उलटूनही आदिवासी विकास महामंडळाने फिर्याद नोंदविली नव्हती. त्यामुळे त्यांची कोण पाठराखण करतंय, असा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी पंडा यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून १७ एप्रिल रोजी या घोटाळ्यात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्यांवर गुन्हा नोंदविण्यासाठी प्रादेशिक व्यवस्थापकांना आदेशित करावे, अशी विनंती केली होती. 

यांच्यावर झाला गुन्हा दाखलप्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांनी आरमोरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवणे यांना प्राधिकृत केले. सोनवणे यांनी १९ रोजी पहाटे कुरखेडा ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, कुरखेडाचे प्रादेशिक उपव्यवस्थापक एम.एस. बावणे, विपणन अधिकारी सी. डी.कासारकर, एच.व्ही. पेंदाम व संबंधित अध्यक्ष, सचिव , संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. 

आरोपींचा शोध सुरु"या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु आहे.  संपूर्ण प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल.  तपास झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करु. "- रवींद्र भोसले, उपअधीक्षक कुरखेडा

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPaddyभातCropपीकfraudधोकेबाजीFarmerशेतकरी