गेर्रा येथे प्लास्टिक मलचिंगद्वारे धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:27 IST2017-08-16T23:26:53+5:302017-08-16T23:27:28+5:30

अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावरील वांगेपली ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गेर्रा गावातील शेतकरी वनीता डुंगा कोरमी यांच्या शेतात......

Paddy rosin through plastic molding at Gerra | गेर्रा येथे प्लास्टिक मलचिंगद्वारे धान रोवणी

गेर्रा येथे प्लास्टिक मलचिंगद्वारे धान रोवणी

ठळक मुद्देपाच एकरात यशस्वी लागवड : कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी पद्धत

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावरील वांगेपली ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गेर्रा गावातील शेतकरी वनीता डुंगा कोरमी यांच्या शेतात तालुका कृषि विभाग आणि आत्मा गडचिरोली यांच्या पुढाकाराने ५ एकर क्षेत्रात प्रथमच प्लास्टिक मलचिंगद्वारे यशस्वीरित्या धानाची लागवड करण्यात आली.
यापद्धतीने भात, हरभरा, पोपट उन्हाळी मुंग, अशी नगदी पिके घेता येतात. यापूर्वी सदर शेतात पारंपरिक पद्धतीने धानाची रोवणी करण्यात येत होती. परंतु यंदा तालुका कृषि कार्यालय आणि आत्मा यांच्या पुढाकाराने शेतकरी कोरमी यांनी मलचिंग पेपरवर धानाची रोवणी केली. सदर उपक्रमाची माहिती प्रशिक्षण आणि यासाठी लागणार मलचिंग पेपर ३७ हजार रुपयांत कार्यालयातर्फे मोफत देण्यात आले. याशिवाय बियाणे, तननाशक औषधी देखील मोफत दिल्या गेले.
या पद्धतीने धानपिकाची लागवड केल्यास २१० रूपये प्रती गुंठा इतका खर्च कमी येतो. सद्य:स्थितीत प्रत्येक शेतकरी कापूस व तुरीच्या लागवडीवर भर देत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने लागवड सुरू आहे. प्लास्टिक मलचिंग पद्धतीने तूर, कापूस, उडीद पिकांची लागवड करता येते. सदर पीक निघाल्यावर लगेच हरभरा व उन्हाळी मुगाची लागवड करता येते, अशी माहिती शेतकरी वनीता कोरमी यांनी दिली. २०१८-१९ च्या हंगामात सदर प्लास्टिक मलचिंग पद्धतीवर अधिक भर देऊ, असे अहेरीचे तालुका कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी सांगितले.
हे आहेत पद्धतीचे फायदे
कमी खर्चात व कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही पद्धत आहे.
तनाचा प्रादुर्भाव कमी होतो.
धांनावर किडीचा देखील प्रादुर्भाव फार कमी होतो
जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.
मालचिंग पेपर वर एका वर्षात तिन पिके घेता येतात.
मालचिंगचा वापर किमान दोन वर्षे करून मशागत खर्चात बचत करता येते.
या पद्धतीने धांनाची लागवड केल्याने जमिनीची धुप होत नाही.

Web Title: Paddy rosin through plastic molding at Gerra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.