मोहली केंद्रावरील धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:20+5:30

मोहली येथील धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या धानाचे बिल तयार करण्यास दिरंगाई व्हायची. तसेच खरेदी केलेले धान उघड्यावर पडून होते. उचल करण्यास दुर्लक्ष केले जायचे. शेतकऱ्यांचे चुकारेही अडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या.

Paddy purchase closed at Mohali Center | मोहली केंद्रावरील धान खरेदी बंद

मोहली केंद्रावरील धान खरेदी बंद

ठळक मुद्देदेयके बनविण्याचे काम सुरू : संचालक मंडळाकडून व्यवस्थापकाची उचलबांगडी

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धानोरा तालुक्यातील मोहली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकाविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल संचालक मंडळाने घेऊन बैठक बोलाविली व व्यवस्थापकांची उचलबांगडी केली. त्यामुळे सध्या काटा करण्याचे काम बंद झाले असून बिल तयार करणे व हुंड्या टाकण्याचे काम सुरू आहे.
मोहली येथील धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या धानाचे बिल तयार करण्यास दिरंगाई व्हायची. तसेच खरेदी केलेले धान उघड्यावर पडून होते. उचल करण्यास दुर्लक्ष केले जायचे. शेतकऱ्यांचे चुकारेही अडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे संचालकांनी तातडीने बैठक घेऊन व्यवस्थापकांना नोटीस बजावले व त्यांच्याकडील कारभार काढून घेतला. येथील खरेदी केंद्रात आतापर्यंत १३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी केवळ १ हजार ४०० क्विंटल धानाची उचल झाली आहे. खरेदी केलेला उर्वरित धान अद्यापही केंद्रावर पडून आहे. १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीतच आधारभूत धान खरेदी केली जाते. जवळपास २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु केंद्र परिसरात अद्यापही धान पडून असल्याने धानाची खरेदी होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच पुन्हा खरेदी केंद्रावरील काटा बंद करण्यात आल्याने धानाची खरेदी केव्हा होणार, अशी प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी महिनाभरापासून माल आणून टाकला आहे.

आयडी केला रद्द
मोहली येथील व्यवस्थापक लोणारे यांच्याकडील प्रभार काढून तात्पुरत्या स्वरूपात रांगी येथील सुरेश हलामी यांच्याकडे सोपविला आहे. तसेच त्यांचा आयडी रद्द करण्यात आल्याची माहिती धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाने दिली.

Web Title: Paddy purchase closed at Mohali Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.