शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांची अडचण हाेऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाची यंत्रणा कामाला लागली असून आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राला ३ ते ४ नाेव्हेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर साधारणता १० नाेव्हेंबरपासून खरीप हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू हाेणार आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिराेली जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात धानाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.  

ठळक मुद्देखरीप हंगाम : ३२ आविका संस्थांचे प्रस्ताव प्राप्त

दिलीप दहेलकर ।लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने यंदा सन २०२०-२१ या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आत्तापर्यंत ३२ संस्थांचे धान खरेदी करण्याबाबतचे प्रस्ताव ठरावासह महामंडळाच्या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. पुढील कार्यवाही गतीने सुरू असून जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू हाेणार आहेत. शेतकऱ्यांची अडचण हाेऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाची यंत्रणा कामाला लागली असून आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राला ३ ते ४ नाेव्हेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर साधारणता १० नाेव्हेंबरपासून खरीप हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू हाेणार आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिराेली जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात धानाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.  गडचिराेली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात धानाची शेती माेठ्या प्रमाणात केली जाते. जवळपास दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दरवर्षी खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली जाते. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी कमी व जास्त मुदतीच्या जड, मध्यम व हलक्या प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. सध्यास्थितीत कमी मुदतीच्या धान पिकाची कापणी व बांधणीचे काम सुरू आहे.  काही शेतकरी हलक्या धानाची मळणी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी लगबगीने मळणी करून धान व्यापाऱ्यांना  विकण्यासाठी पुढे येतात. उसणवारचे देणे व कर्जफेड करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान विकून आपले काम भागवून घेतात. अशास्थितीत खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट हाेते. ही लूट थांबवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हमीभाव आधारभूत धान खरेदी याेजना सुरू केली आहे. या याेजनेची अंमलबजावणी आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात केली जाते. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ५४ आविका संस्था आहेत. यापैकी आत्तापर्यंत ३२ संस्थांनी यावर्षीच्या खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यासाठीचा ठराव घेऊन तसा प्रस्ताव महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केले आहे. यामध्ये कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १०, काेरची ९, आरमाेरी ६ व धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील ७ आविका संस्थांचा समावेश आहे. उर्वरित संस्थांचे प्रस्ताव येणे शिल्लक आहे. या आविका संस्था संचालक मंडळाची बैठक घेऊन धान खरेदीचा ठराव येत्या काही दिवसात घेणार आहेत. घाेट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत चार आविका संस्थांचे प्रस्ताव लवकरच प्राप्त हाेणार आहेत, अशी माहिती गडचिराेली कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. आविका संस्थांचे ठराव व प्रस्तावाची छाननी करून सर्व संस्थाचे एकत्रित प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी गडचिराेली यांच्याकडे महामंडळ कार्यालयाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. 

अहेरी उपविभागात राहणार ३९ केंद्रमहामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात ३७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले हाेते. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन हेडरी व पेंटिपाका येथे नवीन धान खरेदी केंद्र देण्यात येणार आहे. जुने व नवीन मिळून यावर्षी ३९ केंद्रांवरून पाच तालुक्यात धानाची खरेदी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी