केंद्रांवरून धान खरेदीचा धडाका जोमात

By Admin | Updated: December 3, 2015 01:43 IST2015-12-03T01:43:34+5:302015-12-03T01:43:34+5:30

गडचिरोली/ देसाईगंज : जिल्ह्यातील सर्व प्रतिच्या धान पिकाची कापणी संपन्न झाली. अनेक ठिकाणी मळणीही जोमात सुरू आहे.

Paddy procurement from center | केंद्रांवरून धान खरेदीचा धडाका जोमात

केंद्रांवरून धान खरेदीचा धडाका जोमात

येवली, देसाईगंजात केंद्र सुरू : शेतकऱ्यांसाठी धान विक्री करणे झाले सुलभ
गडचिरोली/ देसाईगंज : जिल्ह्यातील सर्व प्रतिच्या धान पिकाची कापणी संपन्न झाली. अनेक ठिकाणी मळणीही जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गडचिरोली तालुक्यातील येवली तसेच देसाईगंज येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना धान विक्री करणे सुलभ झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील येवली येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक डॉ. बळवंत लाकडे, सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष विलास भांडेकर, मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, लोमेश कोहळे, रामदास पिपरे, धिसूलाल काबरा, रूमाजी भांडेकर, नारायण हेमके, रघुनाथ बावनथडे उपस्थित होते. प्रास्ताविक शशिकांत साळवे यांनी केले. शेतकऱ्यांनी धान केंद्रातच विक्रीसाठी आणावे, असे आवाहन त्यांनी केले. संचालन सी. पी. भांडेकर तर आभार नरेंद्र वाकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी लाडे, मांदाळे, कावळे, लोंढे, सिडाम व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा याकरिता देसाईगंज येथील शासकीय गोदामात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष श्याम उईके, नगर परिषदेचे उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, नगरसेवक राजू जेठानी, विलास ढोरे उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले धान्य विक्रीसाठी धान खरेदी केंद्रातच आणावे, असे आवाहन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Paddy procurement from center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.