शेतकऱ्यांना भात लागवडीचे धडे
By Admin | Updated: July 6, 2015 02:00 IST2015-07-06T02:00:10+5:302015-07-06T02:00:10+5:30
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शनिवारी कृषक विज्ञान मंचची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना भात लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना भात लागवडीचे धडे
कृषी जागृती सप्ताह : कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम; कृषक विज्ञान मंचाची सभा
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शनिवारी कृषक विज्ञान मंचची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना भात लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सभेचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. लांबे यांनी भात लागवडीच्या आधुनिक तंत्राबाबत माहिती दिली. ही पद्धत वापरल्याने धानाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. धान बांधावरील तूर पिकाबरोबरच सलग तुरीची लागवड करावी, तुरीच्या डाळीला चांगला भाव असल्याने आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन केले.
विषयतज्ज्ञ डॉ. एस. एल. बोरकर यांनी धानावरील किड व रोग तसेच भाजीपाल्यावरील किड व रोग त्याचे व्यवस्थापन या प्रमुख मुुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. डी. एन. अनोकार यांनी भात लागवड व तूर लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अनेक शेतकरी उपस्थित होते. गडचिरोली येथे पी. के. व्ही एच. एम. टी. प्रतिकिलो ४० रूपये प्रमाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
संचालन डॉ. एस. एल. बोरकर तर आभार प्रा. डी. एन. अनोकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद भांडेकर, देवराव ठाकरे, जितेंद्र कस्तुरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)