ओट्यांमुळे चामोर्शी बाजाराचे रूप पालटले

By Admin | Updated: April 10, 2015 01:13 IST2015-04-10T01:13:05+5:302015-04-10T01:13:05+5:30

ग्राम पंचायतीने स्थानिक आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसाठी ओटे बणविले असून जमिनीवर ब्लॉक फरची लावली आहे.

The oysters changed the shape of the Chamorshi market | ओट्यांमुळे चामोर्शी बाजाराचे रूप पालटले

ओट्यांमुळे चामोर्शी बाजाराचे रूप पालटले

चामोर्शी : ग्राम पंचायतीने स्थानिक आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसाठी ओटे बणविले असून जमिनीवर ब्लॉक फरची लावली आहे. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचे झाले आहे.
चामोर्शी शहरात दर गुरूवारी आठवडी बाजार भरते. शहराची २० हजार लोकसंख्या व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक भाजीपाला व इतर वस्तूंसाठी आठवडी बाजारावरच अवलंबून राहतात. आठवडी बाजाराला हजारो नागरीक व व्यापारी येतात. मात्र येथील दुरवस्थेचा त्रास ग्राहक व व्यापाऱ्यांना सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून बाजाराच्या जागेत लांबच लांब १२ ओटे, शौचालय, पाण्याची टाकी, सिमेंट रस्ता, ब्लॉक फरची लावण्यात आली आहे. या कामासाठी २५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी सरपंच, ग्राम विकास अधिकारी, आठवडी बाजार समितीचे सदस्य, शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांची दहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. किरकोळ काम करणे बाकी आहे, अशी माहिती ग्राम विकास अधिकारी प्रदीप भांडेकर यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The oysters changed the shape of the Chamorshi market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.