शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

म्हणे टॉवर मालकांचा पत्ताच मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 5:00 AM

विशेष म्हणजे ज्या जागेवर टॉवर उभा आहे त्या जागेच्या मालकाकडे मोबाईल टॉवर कंपनीचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांकासह सर्वकाही सहज मिळू शकत असताना नगर परिषदेने कारवाई न करण्यामागील दिलेले कारण अतिशय हास्यास्पद ठरत आहे. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत त्या जागेच्या मालकांकडेही याबाबत चौकशी करू न शकलेला नगर रचना विभाग कारवाईच करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअनधिकृत टॉवर प्रकरण : १५ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर नगर परिषदेने गडचिरोली शहरातील अवैधरित्या उभारलेल्या मोबाईल टॉवरचा सर्वे केला असता १९ मोबाईल टॉवर आढळून आले. त्यापैकी नगर परिषदेकडे १३ टॉवरची नोंद आहे. यावरून उर्वरित सहा टॉवर कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असल्याचे दिसून आले. मात्र त्या मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांचा पत्ताच मिळत नसल्याने त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई अद्याप केलेली नसल्याचे अजब कारण नगर रचना विभागाकडून दिले जात आहे.विशेष म्हणजे ज्या जागेवर टॉवर उभा आहे त्या जागेच्या मालकाकडे मोबाईल टॉवर कंपनीचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांकासह सर्वकाही सहज मिळू शकत असताना नगर परिषदेने कारवाई न करण्यामागील दिलेले कारण अतिशय हास्यास्पद ठरत आहे. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत त्या जागेच्या मालकांकडेही याबाबत चौकशी करू न शकलेला नगर रचना विभाग कारवाईच करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे.नगर परिषद क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रत्येक बांधकामाला नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे, अन्यथा ते बांधकाम अनधिकृत समजल्या जाते. मोबाईल टॉवर एखाद्या नागरिकाच्या घरावर तसेच एखाद्या प्लॉटवर उभारले जातात. दोन्ही प्रकारे टॉवर उभारले तरी त्यासाठी नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अर्ध्याहून अधिक मोबाईल टॉवरची परवानगीच घेण्यात आली नसल्याची बाब लोकमतने नगर परिषदेच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर नगर परिषदेने सर्वे केला. त्यामध्ये सहा टॉवर विनापरवानगीने असल्याचे दिसून आले. मोबाईल टॉवरचा मालक व घरमालक या दोघांनाही तत्काळ नोटीस बजावणे आवश्यक होते. मात्र आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत नगर परिषदेने एकाही घरमालकाला नोटीस बजावली नाही. त्यामुळे घरमालक व मोबाईल टॉवरचे मालक अजुनही बिनधास्त आहेत. विशेष म्हणजे, यावरून नगर परिषदेचे प्रशासन किती बेजबाबदार आहे, याचा अंदाज येण्यास मदत होते.बहुतांश मोबाईल टॉवर हे कंपन्यांचे आहेत. त्यामुळे मोबाईल टॉवरचा पत्ता म्हणजेच त्या कंपनीच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता राहते. मुख्य कार्यालये दिल्ली, मुंबई यासारख्या ठिकाणी आहेत. या कंपन्यांचे देशभरात हजारो मोबाईल टॉवर आहेत. मात्र नगर परिषद प्रशासन मोबाईल टॉवर मालकाचे पत्ते इंटरनेटवर शोधत आहे. मोबाईल टॉवर मालकाचा नेमका पत्ता मिळत नसल्याने नेमके पाठवायचे कुठे यावरच मागील १५ दिवसांपासून चर्चा सुरू आहे.मोबाईल टॉवरचा मालक शोधण्यापेक्षा सर्वप्रथम घरमालकाला गाठून त्याला नोटीस देणे आवश्यक आहे. घरमालकासोबत संबंधित कंपनीचा जो काही करार झाला असेल, त्या करारावर टॉवर मालक व इतर सर्व बाबी भेटण्याची शक्यता आहे. मात्र १५ दिवसांचा कालावधी उलटूनही एकाही घरमालकाला नोटीस दिली नाही. त्यामुळे घरमालक सुध्दा बिनधास्त आहेत.मनुष्यबळ कमी असल्याचा बहाणाएखाद्या तक्रारीसंदर्भात कारवाई करायची असल्यास नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी आहे, असा बहाणा केला जातो. मात्र शहरातच असलेल्या मोबाईल टॉवर मालकांना नोटीस नेऊन देण्यासाठी १५ दिवसातून एकही दिवस मिळू नये यावरून या प्रकरणाचे गांभिर्य नगर परिषद प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषद कोणतीच कारवाई करीत नसल्याने मोबाईल टॉवर कंपन्यांचे घरमालक व टॉवर मालक निर्ढावले आहेत. विशेष म्हणजे, यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न सुध्दा बुडत आहे. पण त्याबाबत सर्वच अधिकारी बेफिकिर असल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेच्या अशा कारभारामुळेच गडचिरोली शहरातील अनेक नागरिक परवानगी न घेताच घरे बांधतात. अनेक दुकानदारांकडे पार्र्किंगसाठी जागा नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Mobileमोबाइल