ओव्हरलोड वाहतुकीने परिसीमा ओलांडली
By Admin | Updated: November 1, 2014 22:52 IST2014-11-01T22:52:32+5:302014-11-01T22:52:32+5:30
रेल्वे स्थानकावर रॅकपार्इंटवरील माल उचल करण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़ भरधाववेग व कर्णकर्कश आवाजाच्या हार्न मुळे नागरीक त्रस्त झाले आहेत़

ओव्हरलोड वाहतुकीने परिसीमा ओलांडली
देसाईगंज : रेल्वे स्थानकावर रॅकपार्इंटवरील माल उचल करण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़ भरधाववेग व कर्णकर्कश आवाजाच्या हार्न मुळे नागरीक त्रस्त झाले आहेत़ या वाहनांच्या वेगामुळे कित्येक नागरीक थोडक्यात बचावले असल्याचे सांगतात. मात्र बस स्थानक परिसरात असलेल्या पोलिस चौकीतील वाहतूक पोलीस याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत़
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक शहरात असून रेल्वे प्रशासनाने जिल्हाभर रेशन, खत पुरविण्याच्या दृष्टीने येथे रॅक पाईंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ रॅक पार्इंट परीसरात जाण्याकरीता बसस्थानक परिसरातूनच जावे लागते़ रॅक पार्इंटवर मालवाहक रेल्वेगाडी येताच ट्रकसारख्या जडवाहनांची गर्दी येथे वाढते़ शहरातील बस स्थानक परीसर नेहमीच गजबजलेला असतो़ अशा वेळी माल उचल करण्याच्या नादात वाहन चालकाचा वेगावरील ताबा सूटलेला असतो़ स्वत:च्या वाहनांचा क्रमांक आधी लागला पाहिजे याकरीता टॅ्रक चालकांची धावपळ सुरू असते़ भरधाव वेग व कर्णकर्कश हॉर्न यामुळे रस्त्यावरील नागरीक अपघाताच्या भितीने आधीच बाजूला होतात़ कित्येक नागरीक या जड वाहनांच्या अपघातात थोडक्यात बचावले आहेत़ वाहतूक पोलिसांना याबाबत सूचना करूनही ते ऐकत नसल्याचे नागरीकांनी सांगितले़ रॅक पाईटवर दाखल होणाऱ्या भरधाव वाहनाच्या वेगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही़
गडचिरोली शहरासह तालुक्यातही रात्रीच्या सुमारास अवैध जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. चामोर्शी, धानोरा, अहेरी, भामरागड, आरमोरी व अन्य तालुक्याच्या ठिकाणाहून रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असते. गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोड जड वाहतूक होताना दिसून येत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करीत आहे. ओव्हरलोड जड वाहतुकीमुळे अनेकदा अपघात घडले आहेत. पोलीस विभागाने विशेष पथक गठीत करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.