शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

जास्त प्रमाणात मतदान हा लोकशाहीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमात मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा; राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदार व कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली सारख्या दुर्गम भागात राज्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मतदान होते, हा लोकशाहीचा विजय आहे. निवडणूक प्रक्रिया राबविणारे पोलीस व निवडणूक कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमात मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले निवडणूक प्रक्रियेत काम करणारे बुथ पातळी ते जिल्हा स्तरावरचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे योगदान पारदर्शक निवडणुका पार पाडण्यात महत्वाचे आहे. यापूर्वी जिल्ह्यात निवडणूका म्हटले की जीवीत हानीच्या घटना घडत होत्या. आता लोकशाही बळकट झाली आहे, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमात पाच नवमतदार, पाच अपंग मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गुरवळा शाळेतील शिक्षक ए.ए. देवळीकर, गडचिरोली नगर परिषद शाळेचे शिक्षक पी.डी. रामटेके, येवलीचे कृषी सहायक के.पी. सातार, शिवणी तलाठी एम.एन. भुरसे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ- ठुबे यांनी केले. तर संचालन एस.के. चडगुलवार यांनी केले. आभार गडचिरोलीचे तहसिलदार महेंद्र गणवीर यांनी मानले.आर्थिक मदतराष्ट्रीय मतदार दिवस व लोकशाही पंधरवडा यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजय झालेल्या स्पर्धकांनाही सन्मानित केले. यावेळी मलमपोंडू भामरागड येथे २००९ मधील शहिद पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना १० लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान बापू गावडे यांचा आकस्मिक मृत्यु झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी १५ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी