अडीच लाखांवर नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:33+5:302021-09-02T05:19:33+5:30
गडचिराेली : काेराेना महामारीत राेगप्रतिकार शक्ती वाढविणे व काेराेनापासून प्रतिबंधात्मक संरक्षण व्हावे, यासाठी आराेग्य विभागातर्फे लसीकरण माेहीम राबविली जात ...

अडीच लाखांवर नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा
गडचिराेली : काेराेना महामारीत राेगप्रतिकार शक्ती वाढविणे व काेराेनापासून प्रतिबंधात्मक संरक्षण व्हावे, यासाठी आराेग्य विभागातर्फे लसीकरण माेहीम राबविली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ८६० लाेकांनी पहिला डाेस तर ९१ हजार ५०४ लाेकांनी दुसरा डाेस घेतला आहे. २ लाख ५८ हजार ३५६ लाेकांना काेराेना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा आहे. काेविशिल्डची पहिली लस घेतल्यानंतर ८४ दिवस तर काेव्हॅक्सिनची पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरे लसीकरण हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा आहे.
बाॅक्स...
शेतीची कामे ठरली अडचण
जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात धान राेवणीची कामे जाेमात सुरू हाेती. संपूर्ण जुलै महिना धान राेवणीच्या कामात गेला. त्यानंतर निंदण सुरू झाले. तर पावसामुळे खाेळंबलेली राेवणी ऑगस्टमध्ये बहुतांश पूर्ण झाली. या कामामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक पहिला व दुसरा डाेस घेऊ शकले नाही. शेतीची कामे लसीकरणात अडथळ्याची ठरली.
बाॅक्स...
दुसरा डाेस आवश्यकच
काेराेना प्रतिबंधक लसीकरणासाठी दाेन डाेस घेणे आवश्यक आहे. दाेन डाेस घेतल्याशिवाय लसीकरण पूर्ण झाले असे म्हणता येत नाही. दाेन्ही डाेस घेतल्यानंतरच संबंधित व्यक्तीमध्ये काेराेनाशी लढण्यासंदर्भात आवश्यक राेगप्रतिकारक शक्ती निर्माण हाेते.
काेट...
काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे दाेन्ही डाेस घेणे आवश्यक आहे. दाेन्ही डाेसमुळे व्यक्तीमध्ये काेराेनाशी लढण्यासंदर्भात याेग्य राेगप्रतिकार शक्ती निर्माण हाेते. दाेन्ही डाेस घेतलेल्या व्यक्तीला काेराेना झालाच तरी साैम्य लक्षणे राहतात. व्यक्तीवर फारसा परिणाम हाेत नाही.
- डाॅ.समीर बन्साेडे, जिल्हा समन्वयक