लाॅकडाऊनमुळे हरपले मैदानी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:49+5:302021-05-27T04:38:49+5:30
संचारबंदी असल्याने लहान बालकांना घराबाहेर पडणे कठीण बनल्याने चिमुकल्यांचे मैदानी खेळ हिरावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मैदानी खेळ म्हणजे ...

लाॅकडाऊनमुळे हरपले मैदानी खेळ
संचारबंदी असल्याने लहान बालकांना घराबाहेर पडणे कठीण बनल्याने चिमुकल्यांचे मैदानी खेळ हिरावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मैदानी खेळ म्हणजे जे खेळ मैदानावर खेळले जातात. खेळाने संपूर्ण शारीरिक हालचाल होते. तसेच शरीर सुदृढ राहण्यास मदत होऊन तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही खेळ एकट्याने खेळायचे असतात, तर काही खेळ खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळामध्ये क्रिकेट, फुटबॉल, उंचउडी, लंगडी, खो - खो, बॅडमिंटन, बाॅस्केटबॉल अशा विविध खेळांचा समावेश होतो. कोविड चाचणीदरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यातील अत्यावश्यक दुकाने, मेडिकल वगळता अन्य दुकाने बंद आहेत. उन्हाळ्यात मनसोक्त खेळ खेळले जात असत. मात्र लाॅकडाऊनमुळे या मैदानी खेळातून मिळणारा आनंद लोप पावला आहे.