उन्हाळी धानावर रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:51+5:30
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील धान पिकाची हानी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. पुन्हा रबी हंगामात उन्हाळी धानाचे पºहे टाकले. धान पऱ्हे रोवणीयोग्य झाल्यानंतर रोवणी केली.

उन्हाळी धानावर रोगाचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : खरीप हंगामातील धान पीक निघाल्यानंतर उन्हाळी धान पिकाचे पºहे टाकून रोवणी केली जाते. वैरागड भागासह आरमोरी तालुक्यात रबी हंगामातील धान पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घेतले आहे.
उन्हाळी धान पिकाची रोवणी झाल्यापासून वातावरणातील सततच्या बदलाने छोट्या-मोठ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. मात्र आता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हिरवेकंच पीक दिसत असताना पुन्हा करपा रोगाचा प्रादुर्भाव धान पिकावर वाढला आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील धान पिकाची हानी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. पुन्हा रबी हंगामात उन्हाळी धानाचे पºहे टाकले. धान पऱ्हे रोवणीयोग्य झाल्यानंतर रोवणी केली. खरीपातील ओलावा कमी झाला नाही आणि लगेच उन्हाळी धान पिकाची रोवणी झाली. उन्हाळी धानाच्या रोवणीचे काम मार्च महिन्यात झाले तर या धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. मात्र यावर्षी मार्चपूर्वीच फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी धानाची रोवणी केली. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. गेल्या चार-पाच वर्षात शासकीय योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर, कृषी पंप, तलाव व शेततळे आदींची सुविधा झाली. सिंचन सुविधा वाढल्याने आरमोरी तालुक्यात रबी हंगामातील उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढले आहे. करपा रोगाला आटोक्यात आणण्यासाठी बरेच शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत.