सर्वेक्षणात जिल्ह्यात आढळली ५०८ शाळाबाह्य बालके

By Admin | Updated: July 6, 2015 01:46 IST2015-07-06T01:46:15+5:302015-07-06T01:46:15+5:30

राज्यातील कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

Out of the 508 out-of-school children found in the survey, | सर्वेक्षणात जिल्ह्यात आढळली ५०८ शाळाबाह्य बालके

सर्वेक्षणात जिल्ह्यात आढळली ५०८ शाळाबाह्य बालके

दोन न.प. क्षेत्रात १६ : भामरागडात सर्वाधिक शाळाबाह्य मुले
गडचिरोली : राज्यातील कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ६ ते १४ वयोगटातील मुले, मुली मिळून एकूण ५०८ शाळाबाह्य बालके असल्याचे आढळून आले. सर्वेक्षणात भामरागड तालुक्यात सर्वाधिक १२७ तर गडचिरोली व देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात १६ शाळाबाह्य मुले आढळून आले आहे.
शिक्षण विभाग व इतर विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाने गावागावात घरोघरी बसस्थानक, बाजार, चौकात तसेच गर्दीच्या ठिकाणी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकरिता २ हजार ६७० प्रगणक, १३७ झोनल अधिकारी व तालुकास्तरावरील १२ व जिल्हास्तरावरील तीन, असे एकूण १५ नियंत्रक अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. जिल्हास्तरीय सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रणजितकुमार, सहअध्यक्ष जि.प. सीईओ संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनात सर्वेक्षण करण्यात आले.

Web Title: Out of the 508 out-of-school children found in the survey,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.