गडचिरोली पालिकेवर काँग्रेसचा झेंडा हेच आपले ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:34 IST2021-08-01T04:34:03+5:302021-08-01T04:34:03+5:30

ना. वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी शनिवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते यांच्या नेतृत्वात गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती अजय भांडेकर, ...

Our goal is the Congress flag on Gadchiroli Municipality | गडचिरोली पालिकेवर काँग्रेसचा झेंडा हेच आपले ध्येय

गडचिरोली पालिकेवर काँग्रेसचा झेंडा हेच आपले ध्येय

ना. वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी शनिवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते यांच्या नेतृत्वात गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती अजय भांडेकर, चामाेशी पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव उडाण, युवा कार्यकर्ते किशोर भांडेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष विधाते यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तसेच जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी उपाध्यक्ष जीवन नाट, सदस्य प्रभाकर तुलावी, काँग्रेसचे पदाधिकारी रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, गौरव एनप्रेडिवार, सुरेश भांडेकर, कुणाल ताजणे, श्रीनिवास दुल्लमवार, नितीन राऊत, कुणाल पेंदोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

(बॉक्स)

कार्यकर्त्यांना दिल्या टिप्स

आगामी निवडणुकीत काँग्रेसला यश मिळण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलेच काम समजून पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निष्ठावंत कार्यकर्ते समोर आल्यास निश्चितच यश संपादन करता येऊ शकते. कार्यकर्त्यांनी आपल्या वाॅर्डातील बुथ मजबूत करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

Web Title: Our goal is the Congress flag on Gadchiroli Municipality