अन्यथा खतविक्रेत्यांची आयडी रद्द हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:13+5:302021-02-05T08:52:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जे खतविक्रेते ई-पाॅस मशीनचे ३.१ व्हर्जन अपडेट करणार नाहीत, त्यांची आयडी ३१ जानेवारीनंतर रद्द ...

अन्यथा खतविक्रेत्यांची आयडी रद्द हाेणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जे खतविक्रेते ई-पाॅस मशीनचे ३.१ व्हर्जन अपडेट करणार नाहीत, त्यांची आयडी ३१ जानेवारीनंतर रद्द हाेईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी.एम.काेळप यांनी दिला आहे. जिल्हाभरातील रासायनिक खत विक्रेत्यांची बैठक २८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद कार्यालयात पार पडली.
या बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी पी.झेड.तुमसरे, माेहीम अधिकारी के.जी.दाेनाडकर, इफकाे कंपनीचे अधिकारी रितेश मलगार यांच्यासह जिल्हाभरातील रासायनिक खतविक्रेते उपस्थित हाेते. बैठकीदरम्यान ई-पाॅस मशीनचे ३.१ व्हर्जन अपडेट करणे जास्तीत जास्त खतविक्रेत्यांकडून डेस्क टाॅप व माेबाईल व्हर्जन सुरू करून देणे. खतविक्रेत्यांकडे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, बायाेमॅट्रिक मशीन वितरित करणे, क्यूआर काेड सेवा उपलब्ध करून देणे, कार्यरत नसलेल्या खतविक्रेत्यांची एमएफएमएस नाेंदणी रद्द करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुढील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा घेण्यात आला. सभेचे प्रास्ताविक माेहीम अधिकारी के.जी. दाेनाडकर यांनी केले.