इतर तालुक्यांतही महिला बचत गटांना मिळणार रेशन दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:26+5:302021-08-20T04:42:26+5:30
बचत गटांनी संबंधित तहसीलदारांमार्फत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. नवीन रेशन दुकाने दिली ...

इतर तालुक्यांतही महिला बचत गटांना मिळणार रेशन दुकाने
बचत गटांनी संबंधित तहसीलदारांमार्फत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. नवीन रेशन दुकाने दिली जाणाऱ्या गावांमध्ये धानोरा तालुक्यातील वाघभूमी, ईरुपटोला, मंगेवाडा, कटेझरी-१, कोसमी, खेडीमोवाड, मुंज्यालगोंदी, हिरंगे, येरकड-१, येरकड-२, मोडेभट्टी, मेटेजांगदा, मोहली-२, खेडी, बोरी, नवरगाव, सालेभट्टी, गट्टेपायली, चातगाव-१, चातगाव-२, हिपानेर, सावंगा बु., कचकल, रेखाटोला, फुलबोडी, रोंडावाही, कारवाफा, सिंदेसुर, भुसुमकुडी, दुर्गापूर, धानोरा १, खेडेगाव, धानोरा २, पयडी व कटेझरी आदी गावांचा समावेश आहे.
कोरची तालुक्यातील दवंडी, मोहगाव, कोहका, सावली, बोडेंना, बोंडे, गॅरापत्ती, सोहले या गावांचा समावेश आहे.
तसेच कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, खरमतटोला, अरततोंडी, रानवाही, दामेश्वर, कुंभीटोला, भटेगाव, खोब्रामेंढा, येरकडी, मेंढा, चिंचटोला, सावरगाव, वासी, पळसगाव आदी गावे आणि एटापल्ली तालुक्यातील जीवनगठा २, पदेवाही, बुर्गी, पैमा, पुस्कोटी, मर्दकुही, वटेली, झारेवाडा, सरखेडा, चोखेवाडा, मुसरगुडा, कोंदावाही, सिनभटी, भुमकाम, गडदापल्ली, मानेवारा, कारका, झुरी, कुरुमवाडा, कुसरवाही आदी गावांचा समावेश आहे.