आंबेडकर जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
By Admin | Updated: March 31, 2016 01:47 IST2016-03-31T01:47:10+5:302016-03-31T01:47:10+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सुरु असलेल्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार २ एप्रिल रोजी...

आंबेडकर जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
पत्रपरिषद : सहायक आयुक्तांची माहिती
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सुरु असलेल्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार २ एप्रिल रोजी गडचिरोलीत ‘परिवर्तन एक विचार’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचा प्रयोग शहरातील संस्कृती सांस्कृतिक भवनात विनामूल्य सादर होईल, अशी माहिती सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनामनात आणि घराघरांत रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच १ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, विनोद मोहतुरे यांनी दिली .
पुढे बोलतांना मोहतुरे म्हणाले की, ६ एप्रिल रोजी पत्रकारांची कार्यशाळा आयोजित केली आहे. याकार्यशाळेत सामाजिक न्याय व समतेसाठी पत्रकांरासमोरील आव्हाने, महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच दुर्बल घटकांविषयी वार्तांकन करतांना माध्यमांची संवेदनशिलता, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागरुक, ऊर्जा व जलसंसाधनाचे आद्य नियोजन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक आर्थिक-औद्योगिक-पर्यावरणासंबंधी धोरणाचा दुर्बल घटकांवर परिणाम, स्वच्छ अभियानाचे आद्यप्रवर्तक व अंधश्रध्दा दूर करणारे प्रबोधनकार व कवी- संत गाडगेबाबा या विषयावर परिसंवाद व व्याख्यान होणार आहे. (शहर प्रतिनिधी)