शहरी लाेकांकडून वाढली अस्सल ताडीला पसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST2021-02-21T05:00:00+5:302021-02-21T05:00:42+5:30

अहेरी उपविभागात ताडाच्या झाडांची संख्या माेठी आहे. एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर, ताेडसा परिसरात राहणारे आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक जंगलात जाऊन झाडापासून ताडी काढतात. ही ताडी रस्त्यालगत तसेच चाैकाचाैकात विकल्या जाते. विशेष म्हणजे, शासनाच्या सर्वच विभागातील कर्मचारी यात ताडीची आवर्जुन खरेदी करतात. आराेग्यासाठी अतिशय लाभदायक व गुणकारी असलेल्या ताडीला गेल्या १५ ते २० दिवसांपासून मागणी वाढली आहे.

Ordinary Tadi is preferred by urban lakes! | शहरी लाेकांकडून वाढली अस्सल ताडीला पसंती !

शहरी लाेकांकडून वाढली अस्सल ताडीला पसंती !

ठळक मुद्देअनेकांना मिळताहेत राेजगार : दुर्गम भागातून कॅन व बॉटल्सची आयात

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या देशी-विदेशी आणि माेहफूल दारूच्या विक्रीला आता ताडीची साथ मिळाली आहे. दारूपेक्षाही दुर्गम भागातील अस्सल ताडी म्हणून शहरी भागातील लाेकांची माेठी पसंती आहे. दुर्गम भागातून कॅन तसेच बाटल्यांमध्ये ताडीची शहरी भागात आयात हाेत आहे. ताडी विक्रीतून एटापल्लीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना मोठा राेजगार मिळत आहे.
अहेरी उपविभागात ताडाच्या झाडांची संख्या माेठी आहे. एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर, ताेडसा परिसरात राहणारे आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक जंगलात जाऊन झाडापासून ताडी काढतात. ही ताडी रस्त्यालगत तसेच चाैकाचाैकात विकल्या जाते. विशेष म्हणजे, शासनाच्या सर्वच विभागातील कर्मचारी यात ताडीची आवर्जुन खरेदी करतात. आराेग्यासाठी अतिशय लाभदायक व गुणकारी असलेल्या ताडीला गेल्या १५ ते २० दिवसांपासून मागणी वाढली आहे. अहेरी उपविभागासह काेरची तालुक्यात तसेच धानाेरा  तालुक्यात अस्सल ताडी नागरिकांना प्राप्त हाेत आहे. ताडीविक्रीला  शासनाकडून कायद्याने सध्यातरी परवानगी नाही. 
जिल्ह्यात एकही नाेंदणीकृत परवानाप्राप्त ताडीचे दुकान नाही. मात्र, १७ ऑक्टाेबर  २००२ च्या न्यायालयाच्या आदेशानुसार, ताडीच्या दुकानाला परवाना देण्यासाठी निर्णय घेण्यासंदर्भात नवी शिफारस लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निर्देशानुसार ताडीची विक्री करण्यासाठी दुकानाला  रितसर परवानगी देऊन त्याचे नूतनीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले  आहे.  त्यामुळे ताडीच्या दुकानांना परवाना प्राप्त करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने १० जणांची समिती गठीत  केल्याची माहिती आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. या जंगलात तसेच शेतशिवार परिसरात ताडीच्या झाडांची संख्या माेठी आहे. झाडावर चढून ताडी काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे काैशल्य लागते. निष्काळजीपणामुळे बऱ्याचदा ताडी काढताना झाडावरून पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Web Title: Ordinary Tadi is preferred by urban lakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.