सेवाज्येष्ठतेनुसार जुन्या सफाई कामगारांना कामावर घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:49+5:302021-09-05T04:41:49+5:30
आरमोरी येथील कंत्राटदाराने कामावरून काढून टाकलेल्या जुन्या सफाई कामगारांचा गेल्या चार-पाच महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. विविध आंदोलने ...

सेवाज्येष्ठतेनुसार जुन्या सफाई कामगारांना कामावर घेण्याचे आदेश
आरमोरी येथील कंत्राटदाराने कामावरून काढून टाकलेल्या जुन्या सफाई कामगारांचा गेल्या चार-पाच महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. विविध आंदोलने करूनही काहीच निर्णय होत नसल्याने शेवटी त्यांनी प्रहारचे निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान, कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडून ३१ ऑगस्टला त्यांच्या दालनात आरमोरी नगर परिषदचे मुख्याधिकारी व स्वच्छता कंत्राटदार दीपक उत्तराधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, तसेच प्रहारचे निखिल धार्मिक यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली. त्यात कामगार आयुक्तांनी कंत्राटदाराला ८ दिवसांत कामगारांना कामावर घ्या; अन्यथा कंत्राट रद्द करण्यात येईल, असे आदेश देऊन लेखी स्वरूपात कंत्राटदाराकडून तसे लिहून घेतले. तसे पत्रसुद्धा आरमोरी नगर परिषद प्रशासनाने कंत्राटदाराला दिले आहे.
(बॉक्स)
अन्य मागण्यांबाबत १४ ला बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रतिनिधी पाठवून कामगारांच्या उपोषणाची दखल घेतली. उपोषणातील अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी दि.१४ सप्टेंबरला बैठक लावण्यात येऊन योग्य न्याय देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सरबत पाजून उपोषणाची सांगता केली.
040921\img_20210904_174440.jpg
प्रहारचे निखिल धार्मिक याना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करतानाच फोटो