काँग्रेसची जिल्ह्यात निदर्शने

By Admin | Updated: December 20, 2015 01:13 IST2015-12-20T01:13:42+5:302015-12-20T01:13:42+5:30

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजपप्रणित राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी ....

Opposition in Congress district | काँग्रेसची जिल्ह्यात निदर्शने

काँग्रेसची जिल्ह्यात निदर्शने

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : भाजप सरकारचा गडचिरोली, कुरखेडा, देसाईगंज येथे कार्यकर्त्यांनी केला निषेध
गडचिरोली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजपप्रणित राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात शनिवारी येथील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
धरणे आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी, गडचिरोली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. सदस्य पूनम गुरनुले, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, पांडुरंग घोटेकर, प्रदेश सचिव लता पेदापल्ली, राकाँ किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अशोक कत्रोजवार, नंदू वाईलकर, रामचंद्र गोटा, पी. टी. मसराम, नगरसेविका निलोफर शेख, पुष्पा कुमरे, पुष्पा ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष प्रतिभा जुमनाके, गडचिरोली तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाणे, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कोवे, महासचिव लता ढोक आदी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र दरेकर, भावना वानखेडे, प्रकाश ताकसांडे, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.
या आंदोलनाला महादेव भोयर, दिवाकर मिसार, रामभाऊ नन्नावरे, खुशाब देशमुख, बापुशा ढोणे, लीलाधर सूरजागडे, गौरव अलाम, तौफिक शेख, प्रतीक बारसिंगे, शंकर शेडमाके, कमलेश खोब्रागडे, कुणाल पेंदोरकर, जगदीश पडिया, सपना गलगट, जया बांबोळे, अनुसया गेडाम, नसिमा पठाण, संगीता वानखेडे, शालिनी खोब्रागडे, जीजा पेंदाम, नीळा निंदेकर, निशा बोदेले आदीसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी एसडीओंना निवेदन देऊन सरकार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करीत आहेत, असे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास ढोरे, हरिश मोटवानी, अरविंद मनोहर चौव्हाण, आरिफ खानानी, अ. शहजाद अ. हमीद शेख, वहीत खान, मो. जमाल अ. गणी शेख, सुनील सहारे, आरिफ कुरेशी यांनी निवेदनात म्हटले आहे.
कुरखेडा येथे निषेध सभा पंचायत समितीसमोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने याच प्रकरणाच्या संदर्भात घेण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले. यावेळी पं. स. सभापती शामिना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, तुळशिराम बोगा, महादेव नाकाडे, गीता धाबेकर, जयंत हरडे, आनंदराव जांभुळकर, नवनाथ धाबेकर, न. पं. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, नगरसेवक मनोज सिडाम, उसमान पठाण, सरपंच टेकमशहा सयाम, शालिकराम मानकर, प्रमोद सरदारे, अहेमद कुरेशी, ताहेर मुगल, रोहीत ढवळे, व्यंकट हरडे, जमील शेख, आसिफ शेख, शेषराव नैताम, टिकाराम ताराम व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Opposition in Congress district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.