बीआरएसपीतर्फे तरुणांना संधी दिली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST2021-08-26T04:39:21+5:302021-08-26T04:39:21+5:30

२३ ऑगस्टला येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता संमेलनात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला गडचिरोली प्रभारी व विदर्भ प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, ...

Opportunity will be given to the youth by BRSP | बीआरएसपीतर्फे तरुणांना संधी दिली जाणार

बीआरएसपीतर्फे तरुणांना संधी दिली जाणार

२३ ऑगस्टला येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता संमेलनात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला गडचिरोली प्रभारी व विदर्भ प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव संजय मगर, महासचिव रमेश पाटील, प्रदेश महिला सहसंयोजिका पूनम घोनमोडे, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सोनाली मेश्राम, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रीतेश अंबादे उपस्थित होते.

४ सप्टेंबरला पक्षाचे अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांच्या गडचिरोली दौऱ्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बन्सोड यावेळी म्हणाले. जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रीतेश अंबादे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मिलिंद बांबोळे, महेश टिपले, प्रतीक डांगे, दीपक बोलीवार, जितेंद्र बांबोळे, विजय देवतळे, अनुराग मेश्राम, किरण बन्सोड, मुकेश सहारे, प्रफुल रायपुरे यांनी सहकार्य केले.

250821\25gad_1_25082021_30.jpg

नवप्रवेशितांसह विशेष फुटाणे, डाॅ. नगराळे, राज बन्साेड व अन्य.

Web Title: Opportunity will be given to the youth by BRSP