शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

ओपन स्पेसच्या कामांना लवकरच होणार सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:06 IST

शहरातील २५ ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे. खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते लांझेडा वॉर्डातील समर्थ यांच्या घराजवळील ओपन स्पेसच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांच्या हस्ते भूमिपूजन : पाच कोटींच्या निधीतून ओपन स्पेसचा होईल विकास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील २५ ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे. खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते लांझेडा वॉर्डातील समर्थ यांच्या घराजवळील ओपन स्पेसच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी नगर उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती रंजना गेडाम, नगरसेविका वर्षा नैैताम, पूजा बोबाटे, रितू कोलते, लता लाटकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोळ, मुख्याधिकारी संजीव ओहोड, नरेंद्र भांडेकर, बालाजी भांडेकर, समर्थ, भुरसे यांच्यासह लांझेडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.गडचिरोली शहरात ४० पेक्षा अधिक ओपन स्पेस आहेत. मात्र या ओपनस्पेसचा विकास झाला नाही. काहींना केवळ संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे तर काहींना संरक्षण भिंतसुद्धा नाही. या ठिकाणी पावसाचे पाणी साचत होते. जवळपासचे नागरिक कचरा टाकत असल्याने घाण पसरत होती. ओपन स्पेसचा विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,यासाठी नगराध्यक्षांसह नगर परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ओपन स्पेसच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. काही ओपन स्पेसच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे.ओपन स्पेसचा विकास होऊन या ठिकाणी बगीचा, मुलांसाठी खेळणे लागल्यास आबालवृद्धांना करमणुकीचे साधन उपलब्ध होईल. गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून विकास कामे करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. शहरात नाली बांधकाम, रस्ता बांधकाम, ओपन स्पेसचा विकास आदी कामांना सुरूवात होईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन खा. अशोक नेते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.