धान विक्रीची खुली बाजारपेठ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:48 IST2017-11-06T22:48:44+5:302017-11-06T22:48:59+5:30
कुरखेडा तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने शासनाच्या निर्णयानुसार कृषी उत्पन्न ....

धान विक्रीची खुली बाजारपेठ सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने शासनाच्या निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या वतीने कुरखेडा येथील बाजार आवारात ३ नोव्हेंबरपासून धान विक्रीच्या व्यवहारास सुरूवात करण्यात आली. धान विक्रीचा शुभारंभ आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती क्षिरसागर नाकाडे, बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, हरिश्चंद्र डोंगरवार, व्यंकटी नागिलवार, हैदरभाई पंजवानी, गुरूमुखदास नागदेवे, दोषहर फाये, विनोद खुणे, विलास गावंडे, चांगदेव फाये, शिवाजी उईके, गणपत सोनकुसरे, सचिव निमजे, दामोधर उईके, दिनेश भदड, धनंजय कुथे यांच्यासह कुरखेडा व वडसातील व्यापारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी बांधवांनी कुरखेडा येथील बाजार आवारातील बाजारपेठेत धान तसेच मिरची, भूईमुग, हळद आदी प्रकारचे कडधान्य विक्रीसाठी आणावे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव व तत्काळ चुकारे देण्यात येईल. त्यामुळे शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या वतीने करण्यात आली आहे. बाजार समितीत धान खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांना विक्रीची सुविधा झाली आहे. शेतकरी येथे विक्रीसाठी धान आणत आहेत.
काही दिवसातच मध्यम व जड प्र्रतीच्या धानाची कापणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर धान खरेदी केंद्रावर शेतकºयांची गर्दी होईल, यादृष्टीने बारदान्याची व्यवस्थाही करणे गरजेचे आहे.