आरमोरीत खुलेआम सुरू आहे अवैध दारू विक्रीचे दुकान
By Admin | Updated: January 12, 2015 22:49 IST2015-01-12T22:49:56+5:302015-01-12T22:49:56+5:30
येथील दूरसंचार विभागाच्या कार्यालयाजवळ सुनिल रामचंद्र जिभकाटे व राहूल रामचंद्र जिभकाटे ह ेदोघे खुलेआम मोह, देशी, विदेशी व बिअर दारूचे दुकान चालवित आहे.

आरमोरीत खुलेआम सुरू आहे अवैध दारू विक्रीचे दुकान
आरमोरी :येथील दूरसंचार विभागाच्या कार्यालयाजवळ सुनिल रामचंद्र जिभकाटे व राहूल रामचंद्र जिभकाटे ह ेदोघे खुलेआम मोह, देशी, विदेशी व बिअर दारूचे दुकान चालवित आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच महिला व मुलांना प्रचंड त्रास होत आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
जिभकाटे हे आपल्या घरातच दारूचा साठा ठेवत असल्यामुळे दारू पिऊन लोक वार्डामध्ये गोंधळ करीत आहेत. लहान मुले दारूच्या आहारी जात आहेत. मात्र आरमोरी ठाण्याचे पोलीस कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये निरिक्षक म्हणून शिंदे कार्यरत झाल्यावर दारूविक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दारूविक्रीही कमी झाली होती. परंतु शिंदे यांची बदली होताच आता वार्डात खुलेआम दारूविक्री सुरू झाली आहे. आरमोरी पोलीस ठाण्याने जिभकाटे यांना दारूविक्रीचा परवाना दिला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांना प्रचंड त्रास होत आहे. सदर अवैध दारूविक्रीचे दुकान बंद न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा आरमोरी येथील वार्ड क्रमांक पाच व दोन येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)