एटापल्ली तालुक्यात फलक उघडेच

By Admin | Updated: February 18, 2017 02:03 IST2017-02-18T02:03:35+5:302017-02-18T02:03:35+5:30

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत विकास कामांचे फलके झाकणे आवश्यक असतानाही गुरूपल्ली-उडेरा

Open the board in Atapalli taluka | एटापल्ली तालुक्यात फलक उघडेच

एटापल्ली तालुक्यात फलक उघडेच

प्रशासनाचे दुर्लक्ष : आचारसंहिता नियमांचा होत आहे भंग
एटापल्ली : निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत विकास कामांचे फलके झाकणे आवश्यक असतानाही गुरूपल्ली-उडेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक विकास कामांची फलके उघडीच आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे या गुरूपल्ली-उडेरा जिल्हा परिषद क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाकडून उभ्या आहेत. एटापल्ली-गट्टा मार्गावरील तुमरगुंडा गावात सुवर्णा खरवडे यांच्या विकास निधीतून खोदण्यात आलेल्या हातपंपाचे फलक अजूनही उघडेच आहेत. केलेल्या विकास कामांचा प्रभाव व मतदारांवर पडू नये, यासाठी विकास कामांची फलके कापडाने झाकणे आवश्यक असले तरी प्रशासनाने सदर फलके उघडीच ठेवली आहेत. याबाबत सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांना विचारणा केली असता, आचारसंहितेच्या काळात विकास कामांची फलके झाकण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणची फलके उघडी आहेत, ती फलके झाकण्याच्या सूचना आणखी दिल्या जातील, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Open the board in Atapalli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.