ओपीडीतील डॉक्टर गायब
By Admin | Updated: December 10, 2015 01:47 IST2015-12-10T01:47:39+5:302015-12-10T01:47:39+5:30
जिल्हा मुख्यालयात कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या ओपीडी (बाह्य रूग्ण विभाग)तील वैद्यकीय अधिकारी

ओपीडीतील डॉक्टर गायब
जिल्हा रूग्णालयातील प्रकार : रूग्णांची हेळसांड व असभ्य व्यवहार
ंगडचिरोली : जिल्हा मुख्यालयात कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या ओपीडी (बाह्य रूग्ण विभाग)तील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आपापल्या कक्षातून अनेकदा गायब राहत असल्याने येथील बाह्य रूग्ण विभागातील रूग्णांची उपचाराअभावी हेळसांड होत आहे. ओपीडीतील चौकशी विभागात एकूणच स्थितीबाबत चौकशी केली असता, कर्मचाऱ्यांकडून असभ्य वागणूक दिली जाते. सदर प्रकार रूग्णालयात नेहमीच घडत असल्याने रूग्ण त्रस्त झाले आहेत.
जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात सकाळी ८.३० वाजतापासूनच रूग्णांची गर्दी होत असते. परंतु सकाळी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आपापल्या कक्षात उपस्थित राहत नाही. परिणामी रूग्णांना त्यांची प्रतीक्षा करावी लागते. विशेषत: वैद्यकीय अधिकारी रूग्णांना टाळतात तर चतुर्थ कर्मचारी रूग्णांना हाकलून लावतात.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ओपीडीमध्ये उपचारासाठी चिठ्ठी काढण्यात आली. परंतु रूग्णालयात चकरा मारून काहीच उपयोग झाला नाही. बुधवारी कक्ष क्रमांक ८ मध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी आपण दोन तास थांबलो. जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी नंतर भेटा म्हणून सांगितले, असे ज्येष्ठ नागरिक उल्हास वाघमारे यांनी सांगितले. रूग्णालयात रूग्णांशी असभ्य वागणूक होत असल्याचाही आरोप वाघमारे यांनी केला आहे.