१ ते ७ वर्गाला केवळ दोनच शिक्षक
By Admin | Updated: December 2, 2014 23:06 IST2014-12-02T23:06:09+5:302014-12-02T23:06:09+5:30
चामोर्शी पंचायत समितींतर्गत कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या ७ वर्गांसाठी आता दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळेत शिक्षणाचा पुरता

१ ते ७ वर्गाला केवळ दोनच शिक्षक
आष्टी : चामोर्शी पंचायत समितींतर्गत कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या ७ वर्गांसाठी आता दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळेत शिक्षणाचा पुरता बट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे, या शाळेत कार्यरत असलेल्या दोन मद्यपी शिक्षकांवर धिंगाणा घातल्याप्रकरणी पं.स. शिक्षण विभागाने कारवाई केली आहे.
कढोली शाळेचे शिक्षक दुर्गे व कढोली शाळेचे शिक्षक दुर्गे व बोलमल्ली यांनी दारू पिऊन शाळेत धिंगाणा घातला होता. गावातील नागरिकांच्या तक्रारीवरून या दोन्ही शिक्षकांवर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वेतनवाढ थांबविण्याची कारवाई केली. तसेख् या दोन्ही शिक्षकांची याच पंचायत समितींतर्गत अन्य शाळांमध्ये बदली केली. त्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रामपूर येथील जि.प. शाळेचे शिक्षक भुसे यांची तात्पुरती कढोली शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रामपूर शाळेत कार्यरत असलेले एक शिक्षक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे तात्पुरती नियुक्ती केलेले शिक्षक घुसे यांना पुन्हा रामपुर शाळेत परत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे कढोली शाळेत १ ते ७ वर्गांसाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. १ ते ७ वर्गांमध्ये ७६ विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेत नव्या शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे.