वाहन परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा ठरताहेत डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:53+5:302021-06-29T04:24:53+5:30

अर्ज भरून झाल्यानंतर वाहतुकीच्या नियमांविषयी काही व्हिडिओ त्याच वेबसाईटवर दाखविले जातात. त्यानंतर परीक्षेला सुरुवात हाेते. मात्र परीक्षेदरम्यान अनेक अडचणी ...

Online exams for driving licenses are becoming a nightmare | वाहन परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा ठरताहेत डाेकेदुखी

वाहन परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा ठरताहेत डाेकेदुखी

अर्ज भरून झाल्यानंतर वाहतुकीच्या नियमांविषयी काही व्हिडिओ त्याच वेबसाईटवर दाखविले जातात. त्यानंतर परीक्षेला सुरुवात हाेते. मात्र परीक्षेदरम्यान अनेक अडचणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. बऱ्याचवेळा प्रश्नपत्रिका उघडत नाही, परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेली ओटीपी येत नाही. परीक्षा देऊन झाल्यानंतर शिकाऊ परवान्याची प्रिंट येत नाही. मग हे नागरिक आरटीओ कार्यालयात येऊन विचारणा करतात. मात्र आरटीओ कार्यालयाशी याचा काहीच संबंध येत नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागते किंवा ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय रद्द करून आरटीओ कार्यालयात परीक्षा देण्याचा सल्ला दिला जात आहे. ऑनलाइन परीक्षेशी संबंधित तक्रारी घेऊन नागरिक आरटीओ कार्यालयात येत आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढली आहे.

बाॅक्स .....

अपंग असल्याचे काेण तपासणार?

शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी अर्ज करणारा एखादा व्यक्ती जास्त प्रमाणात अपंग असेल तर त्याला वाहन परवाना दिला जात नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना याची शहानिशा हाेत नाही. तसेच एखादा मृतक व्यक्तीच्या नावानेही वाहन चालविण्याचा परवाना निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संबंधित व्यक्ती मरण पावला तरी आधार क्रमांक व त्यावर येणाऱ्या ओटीपीवरून वाहन परवान्यासाठी सहज नाेंदणी करता येते.

Web Title: Online exams for driving licenses are becoming a nightmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.