इतलचेरूतील कोंबडा बाजारावर धाड
By Admin | Updated: March 16, 2015 01:10 IST2015-03-16T01:10:47+5:302015-03-16T01:10:47+5:30
येथून १५ किमी अंतरावर असलेल्या इतलचेरू येथील कोंबडा बाजारावर अहेरी पोलिसांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड टाकली.

इतलचेरूतील कोंबडा बाजारावर धाड
अहेरी : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या इतलचेरू येथील कोंबडा बाजारावर अहेरी पोलिसांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड टाकली. या धाडेत पाच जणांना अटक करून कोंबडे, दुचाकी व काही रक्कम जप्त केली आहे.
पाउलत गोविंदराव मडावी (४८), तुळशीराम दसरू आत्राम (३५) दोघेही रा. खमनचेरू, लिंगा दुर्गा तलांडी (५०) रा. टेकुलगुडा, महादेव वसंत आलाम (२४) रा. राजारामखांदला, सतिश चंद्रा आत्राम (२७) रा. तानबोडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. इतलचेरू येथे कोंबडा बाजार सुरू असून या कोंबडा बाजारात हजारो रूपयांचा जुगार खेळला जात आहे, अशी माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड टाकली. या धाडेत पाच जणांना अटक केली. त्याचबरोबर पाच कोंबडे व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षक फिरोज मुलानी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संजय अलमवार, रमेश आत्राम, सुरेश ताराम, बळीराम आळे, संजय बोलुवार, होमगार्ड राजेश झाडे, इंदरशहा गावडे यांनी केली. या धाडीमुळे अहेरी परिसरातील कोंबडा शौकीनांमध्ये धडकी भरली आहे. (शहर प्रतिनिधी)