एनओसीसाठी एक हजाराची वसुली
By Admin | Updated: February 12, 2017 01:24 IST2017-02-12T01:22:01+5:302017-02-12T01:24:04+5:30
येथील सर्वच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना शासनाकडून अन्न व औषध प्रशासनामार्फत परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली आहे.

एनओसीसाठी एक हजाराची वसुली
रक्कम रद्द करा : खाद्य पदार्थासाठी नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक
चामोर्शी : येथील सर्वच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना शासनाकडून अन्न व औषध प्रशासनामार्फत परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र परवान्यासाठी लागणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता नगर पंचायतीने प्रत्येक व्यासायिकाकडून एक हजार रूपयांची देणगी शुल्काच्या रूपात वसूल करणे सुरू केले आहे. यामुळे लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सदर वसुलीची रक्कम रद्द करून नगर पंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी शहर किराणा असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना चामोर्शी शहर किराणा असोसीएशनचे कार्याध्यक्ष राकेश येर्रावार, सचिव प्रफुल्ल भांडेकर, सदस्य वसंत येनगंधेलवार, संतोष पालारपवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, खाद्य पदार्थ विक्रीसाठी शासनाने सर्व व्यावसायिकांना परवाना काढण्याची सक्ती केली असून परवान्याकरिता नगर पंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शुल्क रूपात देणगी न घेता सरसकट एनओसी द्यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
खाद्य पदार्थाच्या परवानाकरिता द्यावयाच्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता घेण्यात येणारे एक हजार रूपये सामान्य पावतीची रक्कम रद्द केली असून १० फेब्रुवारीच्या खास सभेत ठराव घेऊन लहान व्यावसायिकांसाठी ३०० रूपये तर मोठ्या व्यावसायिकांकडून ५०० रूपये घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
- अर्शिया जुही, मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी