एक हजार पाच रूग्णांची नोंदणी
By Admin | Updated: March 25, 2015 01:39 IST2015-03-25T01:39:19+5:302015-03-25T01:39:19+5:30
उपजिल्हा रूग्णालय कुरखेडांतर्गत २४ ते २७ मार्च या कालावधीत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एक हजार पाच रूग्णांची नोंदणी
कुरखेडा : उपजिल्हा रूग्णालय कुरखेडांतर्गत २४ ते २७ मार्च या कालावधीत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिरासाठी १ हजार ५ रूग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी पं.स.च्या सभापती शामिना उईके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती होमराज बुध्दे, डॉ. अरूण शेंद्रे, चांगदेव फाये, राम लांजेवार, कुरखेडाच्या सरपंच आशा तुलावी, उपसरपंच अशोक कंगाले, जि.प. सदस्य निरांजनी चंदेल, अशोक इंदुरकर, प्रभाकर तुलावी, गिता धाबेकर, सिराज पठाण, अविनाश डोंगरे, जीवन पाटील नाकाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांनी केले. यावेळी डॉ. सतिश मेश्राम यांनी विविध आजाराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जगदिश बोरकर तर आभार डॉ. नितीन जनबंधू यांनी मानले.