दुचाकी अपघातात एक जागीच ठार
By Admin | Updated: May 25, 2015 01:51 IST2015-05-25T01:51:18+5:302015-05-25T01:51:18+5:30
येथून लंबडपल्लीकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार...

दुचाकी अपघातात एक जागीच ठार
सिरोंचा : येथून लंबडपल्लीकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सिरोंचा-अंकिसा मार्गावर सिरोंचापासून चार किमी अंतरावर राजूनगरजवळ शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश राजम चपाट (२४) रा. लंबडपल्ली असे मृतक युवकाचे नाव आहे. तर संपत माणिकरवतू (२७) रा. लंबडपल्ली हा जखमी झाला आहे. एमएच ३३ जे ८१५२ या दुचाकीने संपत माणिकरवतू व सुरेश चपाट हे दोघे सिरोंचावरून लंबडपल्लीकडे जात होते. दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने राजूनगरजवळ दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरून खाली पडलेल्या सुरेश चपाट याच्या अंगावरून वाहन गेल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची तक्रार सुरेश चपाट याचा भाऊ तिरूपती चपाट याने सिरोंचा पोलीस ठाण्यात दिली. सिरोंचा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंविचे कलम २७९, ३०४ (अ), ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात जखमी झालेल्या संपत माणिकरवतू याचेवर सिरोंचाच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. या मार्गावर मागील काही वर्षात अनेक मोठे अपघातही झालेले आहे. राष्ट्रीय महामार्गावर हा भाग येतो. त्याची ही दूरावस्था झाली आहे(शहर प्रतिनिधी)