ट्रकखाली चिरडून एक ठार, एक जखमी

By Admin | Updated: February 25, 2017 01:16 IST2017-02-25T01:16:27+5:302017-02-25T01:16:27+5:30

ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

One killed, one injured, crushed under truck | ट्रकखाली चिरडून एक ठार, एक जखमी

ट्रकखाली चिरडून एक ठार, एक जखमी

आष्टी : ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. सदर अपघात आष्टीपासून आठ किमी अंतरावरील चंदनखेडी गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता घडला.
सूरजागड पहाडीवरील जळालेले वाहन क्रेनच्या मदतीने टोचन बांधून बल्हारशहाकडे नेत होते. या ट्रकला ओव्हरटेक करून विलास वसंत कोळवते (२७) याने दुचाकी समोर नेण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकी ट्रकखाली आली. यामध्ये विलास कोळवते हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर मागे बसलेला चंद्रगिरवार हा युवक जखमी झाला आहे. हे दोघेही युवक गोंडपिंपरी तालुक्यातील गणेशपिंपरी येथील आहेत. ते आलापल्लीवरून गोंडपिंपरीकडे जात होते. वाहनचालक राजेंद्र वेलपुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 

Web Title: One killed, one injured, crushed under truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.