दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: October 13, 2016 02:43 IST2016-10-13T02:43:20+5:302016-10-13T02:43:20+5:30
मुलचेरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या कोपरअल्ली-मल्लेरा या मार्गावर भिषण अपघात झाल्याने दुचाकीवरील

दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
मुलचेरा : मुलचेरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या कोपरअल्ली-मल्लेरा या मार्गावर भिषण अपघात झाल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
सुजीत अजीत मंडल (३०) रा. विश्वनाथनगर असे मृतकाचे नाव आहे तर वीरेंद्र दिलीप बावरे रा. कोपरअल्ली हा जखमी झाला आहे. सुजीत मंडल व वीरेंद्र बावरे हे दोघेजण दुचाकीने मल्लेरावरून विश्वनाथनगरकडे जात होते. दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला अपघात झाला. यात सुजीत मंडल हा जागीच ठार झाला तर वीरेंद्र बावरे हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला मुलचेराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.