शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव; गडचिरोली जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 21:10 IST

Accident News: खासगी रूग्णवाहिका (एम. एच. ३४ ए. व्ही. २५६१ ) गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होती.

-दिलीप दहेलकर, गडचिरोली

गडचिरोली : येथून चामोर्शीकडे येणाऱ्या रूग्णवाहिका व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर रूग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला. ही घटना १४ मार्च रोजी म्हणजे धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान चामोर्शी महामार्गावरील नवेगाव रै. गावासमोर घडली. अमोल तानाजी दुधबळे (वय ३०, रा. नवेगाव रै) असे मृताचे नाव आहे. या अपघातात रूग्णवाहिका चालक अंकुश उमाजी सोमनकर हा गंभीर जखमी झाला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

खासगी रूग्णवाहिका (एम. एच. ३४ ए. व्ही. २५६१ ) गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होती, तर अमोल तानाजी दुधबळे हा दुचाकीने नवेगाव रै. वरून समोरच्या गावात जाण्यासाठी निघाला होता. 

भरधाव रूग्णवाहिकेमध्ये गॅस व इतर तांत्रिक अडचणी आल्यामुळे चालकाचा ताबा सुटला. गावच्या मुख्य द्वाराजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक मृत अमोल दुधबळे यांच्या डोक्यावरून रूग्णवाहिकेचे चाक गेल्यामुळे तो जागीच ठार झाला.

या अपघातात रूग्णवाहिका चालक सोमनकर याचे हात पाय मोडले. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघाताची गडचिरोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. 

भाच्याचे प्रेत बघून आत्याचाही मृत्यू 

भाचा अमोल दुधबळे याचा गावाजवळ अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याची आत्या वनिता विलास बारसागडे  (५०) हया घटनास्थळी पोहचली. भाचा जागीच ठार झाल्याचे पाहून तिला भोवळ आली. घरी जाताच तिच्या छातीत दुखून हृदयाचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी गडचिराेलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 

दोघांच्या मृत्यूने आप्तेष्ट गहिवरले

मृत अमोल तानाजी दुधबळे यांचा मागील वर्षी लग्न झाला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व एक लहान मुलगा आहे. तर मृत वनिता विलास बारसागडे यांच्या पश्चात पती, दोन मुले व मुलगी आहे. दोघांवरही वैनगंगा नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी भाचा व आत्याचा अकाली मृत्यू झाल्यामुळे दोन्ही कुटुंबांवर माेठा आघात झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसDeathमृत्यू