जयनगरात एक किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:06 IST2017-09-09T00:05:59+5:302017-09-09T00:06:19+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथील विजय ठाकूरदास मंडल याच्या घरून १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

जयनगरात एक किलो गांजा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथील विजय ठाकूरदास मंडल याच्या घरून १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
विजय ठाकूरदास मंडल हा गांजा विकत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार त्याच्या पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, सहायक फौजदार खुशाल गेडाम, दादाजी करकाडे, पोलीस हवालदार भाऊराव बोरकर, दुधराम चव्हारे, वृषाली चव्हाण, पंकज भगत, चंदू मोहुर्ले, कालिपद मंडल यांच्या पथकाने विजय ठाकूरदास मंडल याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरी १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. गांजा विक्रीतून मिळालेले ९ हजार २५० रूपये सुध्दा जप्त करण्यात आला आहे. याबाबतची लेखी तक्रार चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू बरोबरच गांजाही मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील काही नागरिक याही व्यवसायात गुंतले आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गजरेचे आहे. विशेष करून सणांच्या कालावधीत गांजाची मागणी वाढत असल्याचा अनुभव आहे.