शहरं
Join us  
Trending Stories
1
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
2
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
3
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
4
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
5
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
6
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
7
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले
9
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
10
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
11
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
12
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
13
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
14
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
15
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
16
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
17
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
18
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
19
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
20
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

अज्ञात मोटरसायकलस्वारांच्या गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 7:29 PM

हल्लेखोर नक्षली नसल्याचा अंदाज

गडचिरोली : मोटरसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींनी एका मोपेडस्वारावर देशी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना धानोरा येथे घडली आहे. गोळी झाडून हल्लेखोर पसार झाले. त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. महागू गणू मडावी (५३) हे जांगदा गावावरून एम-८० या मोपेडने मरेगाव येथे एका लग्नासाठी जात होते. यावेळी धानोरा ते रांगी मार्गावरील खेडी गावाजवळ मोटरसायकलवरून मागून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी मडावी यांच्या कमरेखालील भागाला चाटून गेली. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. मडावी यांनी जखमी अवस्थेत कसेबसे मोहली गाव गाठले आणि झालेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. तेथून त्यांना रुग्णवाहिकेनं गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोळी झाडणारे नक्षलवादी नसण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली