अज्ञात मोटरसायकलस्वारांच्या गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 19:29 IST2018-04-15T19:29:19+5:302018-04-15T19:29:19+5:30

हल्लेखोर नक्षली नसल्याचा अंदाज

One injured in an unknown motorcycle firing | अज्ञात मोटरसायकलस्वारांच्या गोळीबारात एक जखमी

अज्ञात मोटरसायकलस्वारांच्या गोळीबारात एक जखमी

गडचिरोली : मोटरसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींनी एका मोपेडस्वारावर देशी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना धानोरा येथे घडली आहे. गोळी झाडून हल्लेखोर पसार झाले. त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.
 
महागू गणू मडावी (५३) हे जांगदा गावावरून एम-८० या मोपेडने मरेगाव येथे एका लग्नासाठी जात होते. यावेळी धानोरा ते रांगी मार्गावरील खेडी गावाजवळ मोटरसायकलवरून मागून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी मडावी यांच्या कमरेखालील भागाला चाटून गेली. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. मडावी यांनी जखमी अवस्थेत कसेबसे मोहली गाव गाठले आणि झालेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. तेथून त्यांना रुग्णवाहिकेनं गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोळी झाडणारे नक्षलवादी नसण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याची चर्चा आहे. 
 

Web Title: One injured in an unknown motorcycle firing