एकाचा मृत्यू तर ११४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST2020-11-09T05:00:00+5:302020-11-09T05:00:20+5:30
आत्तापर्यंत बाधित ६ हजार ५५२ पैकी ५ हजार ६८४ जणांची मुक्तता झाली आहे. तसेच सद्या ८०३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

एकाचा मृत्यू तर ११४ जणांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ७४ नवीन बाधित आढळून आले. ११४ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर चामोर्शी तालुक्याच्या घारगाव येथील ३६ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.
आत्तापर्यंत बाधित ६ हजार ५५२ पैकी ५ हजार ६८४ जणांची मुक्तता झाली आहे. तसेच सद्या ८०३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७५ टक्के, क्रियाशील रूग्णांचे प्रमाण १२.२६ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के आहे. कोरोना आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
हे आहेत जिल्हाभरातील बाधित; गडचिरोलीत सवार्धिक रूग्ण
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील कन्नमवार वॉर्ड ३, आरमोरी रोड १, सर्वोदय वॉर्ड ३, रामपुरी वॉर्ड दुर्गा मंदिरजवळ ५, नवेगाव ३, इंदिरानगर २, कलेक्टर कॉलनी ३, शाहुनगर १, गोकुलनगर २, स्थानिक ३, आयटीआय चौक २, आशीर्वादनगर १, रामनगर १, पोर्ला १, साईनगर नवेगाव १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ६, आलापल्ली २, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ५, महागाव १, देलनवाडी १, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अनखोडा २, स्थानिक १, विकासपल्ली २, येनापूर १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये मोहली १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ७, सीआरपीएफ जवान १, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये टाकलाभाटी १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये आजादनगर १, स्थानिक ३, श्रीरामनगर १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये श्रीनगर १, स्थानिक १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये १ स्थानिकाचा समावेश आहे.
नवीन ७४ बाधितांमध्ये गडचिरोली ३२, अहेरी ८, आरमोरी ७, भामरागड ३, चामोर्शी ६, धानोरा १, एटापल्ली ८, कोरची १, कुरखेडा ५, मुलचेरा २, व सिरोंचा येथील १ जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या ११४ रूग्णांमध्ये गडचिरोली ३६, अहेरी १६, आरमोरी ५, भामरागड २५, चामोर्शी ३, धानोरा १, एटापल्ली ३, मुलचेरा १, सिरोंचा १ कोरची ३, कुरखेडा ५ व वडसा मधील १५ जणाचा समावेश आहे.