शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

१३३ गावांसाठी एकच बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 6:00 AM

कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किमीच्या अंतरावर परिघात असलेल्या १३३ गावांसाठी बँक आॅफ इंडियाची एकमेव बँक शाखा आहे. अपुऱ्या जागेत या शाखेचा कारभार सुरू असून व्यवहार करण्यासाठी येथे खातेदारांची मोठी गर्दी असते. गेल्या नऊ वर्षांपासून तोकड्या जागेत या बँकेचे कामकाज सुरू आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात दोन किमी अंतरावर ही बँक शाखा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील एकूण १३३ गावांसाठी कोरची येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. या शाखेत जवळपास ४० हजार खातेदार आहेत. आर्थिक व्यवहारासाठी या बँक शाखेत प्रचंड गर्दी होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोरची येथे भारतीय स्टेट बँकेची एक नवीन शाखा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किमीच्या अंतरावर परिघात असलेल्या १३३ गावांसाठी बँक आॅफ इंडियाची एकमेव बँक शाखा आहे. अपुऱ्या जागेत या शाखेचा कारभार सुरू असून व्यवहार करण्यासाठी येथे खातेदारांची मोठी गर्दी असते. गेल्या नऊ वर्षांपासून तोकड्या जागेत या बँकेचे कामकाज सुरू आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात दोन किमी अंतरावर ही बँक शाखा आहे. सदर बँक शाखा शहरात नेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र तसे झाले नाही. अधिकाऱ्यांनी सदर बँक शाखा शहरात भाड्याच्या इमारतीत नेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरची येथे बँक शाखेसमोर बसस्टॉप नाही, आॅटो रिक्षाची व्यवस्था नाही. परिणामी कोरची शहरातून दोन किमी अंतर कापून बँक शाखेत जावे लागते. दरम्यान या मार्गावर छत्तीसगड राज्यातून जड वाहतूक होत असते. परिणामी वाहनांच्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बँक शाखेत जावे लागते. सरपंच संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन २०११ मध्ये येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा म्हणून बँक आॅफ इंडियाची शाखा उघडण्यात आली. मात्र ही शाखा शहरापासून दूर आहे.१३३ गावांतील जवळपास ४० खातेदारांचे खाते आहेत. यामध्ये रोजगार हमी योजना, जनधन, निवृत्ती वेतन आदींचे खाते आहेत. तसेच ग्रामसभा, व्यवसायिक, कर्मचारी, शेतकरी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींचा खातेदारांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :bankबँक