ओमनीची झाडाला धडक
By Admin | Updated: November 2, 2014 22:35 IST2014-11-02T22:35:13+5:302014-11-02T22:35:13+5:30
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मारोती ओमनी व्हॅनने झाडाला जबर धडक दिल्याने चालकासह दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना कोरची-कुरखेडा मार्गावरील पुराडा गावानजिक

ओमनीची झाडाला धडक
कुरखेडा : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मारोती ओमनी व्हॅनने झाडाला जबर धडक दिल्याने चालकासह दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना कोरची-कुरखेडा मार्गावरील पुराडा गावानजिक रविवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जितेंद्र सदाराम सहारे (३०), रूजेश्वर महेंद्र उजवणे (३२) आदींचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार जितेंद्र सहारे व रूजेश्वर उजवणे हे दोघेजण एमएच ३१ इए ०२५१ या ओमनी चारचाकी वाहनाने कोरचीवरून कुरखेडाकडे येत होते. दरम्यान, एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात चालक जितेंद्र सहारे व रूजेश्वर उजवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पंकज महाजन यांनी घटनास्थळावर धाव घेतली. वाहनात अडकलेल्या दोन्ही जखमी इसमांना वाहनातून बाहेर काढले.
त्यानंतर त्यांना कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माजी जि.प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी रूग्णालयात जाऊन अपघातातील जखमींची भेट घेतली. जखमींची प्रकृती अधिक खालाविल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)