नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकारी पोहोचले शेतावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:20+5:30
हलक्या धानाची कापणी आटोपली आहे. तर जड धान निसवला असून परिपक्वहोण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने जड धान कोसळून पडले आहे. कोसळलेले धान परिपक्व होत नाही. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकारी पोहोचले शेतावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश शासनाने दिल्यानंतर गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे केले.
हलक्या धानाची कापणी आटोपली आहे. तर जड धान निसवला असून परिपक्वहोण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने जड धान कोसळून पडले आहे. कोसळलेले धान परिपक्व होत नाही. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. राज्यभरातच अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. शेतकºयांची आर्त हाक व अडचण लक्षात घेऊन शासनाने शेतकºयांच्या मदतीसाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतकºयांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी शेतीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. शेतीचे पंचनामे करून अहवाल तत्काळ शासनाकडे सादर करावा, असे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत.
नुकसानीचे पंचनामे करताना कोणताही कसूर राहू नये, यासाठी गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
महेंद्र गणवीर यांनी गडचिरोली तालुक्यातील शिवणी गावातील शेतशिवाराला भेटी दिल्या. अवकाळी पावसामुळे जड धान जमिनीवर झोपले असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्यासोबत तलाठी भुरसे, कृषी सहायक नितीन मुद्देमवार, ग्रामसेवक देवेंंद्र मच्छेवार, शेतकरी काशिनाथ गावतुरे आदी उपस्थित होते.
उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी बोदली, तुकूम परिसरातील शेतीला भेट दिली. त्यांनाही जड धान कोसळले असल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.