रामपूर चकच्या रस्त्यावरील वीज खांबांमुळे अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:50 IST2021-02-26T04:50:58+5:302021-02-26T04:50:58+5:30
कासवी ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या रामपूर चक येथील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ६ ते ७ विद्युत खांबे उभे ...

रामपूर चकच्या रस्त्यावरील वीज खांबांमुळे अडथळा
कासवी ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या रामपूर चक येथील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ६ ते ७ विद्युत खांबे उभे आहेत. रामपूर चक गावात प्रवेश करत असताना रस्त्यावर विजेचे खांबे मध्यभागी असल्याने सदर खांबांमुळे रहदारीस अडथळा निर्माण हाेताे. खांबांमुळे नागगरिकांना त्रास वाढला असून खांब धोकादायक ठरत आहेत. खांब न हटविल्यास येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास ही समस्या अनेकदा आणून दिली; परंतु या समस्येकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रामपूर येथील नागरिकांनी गडचिरोली येथील कार्यकारी अभियंता एस. व्ही. वाशिमकर यांची भेट घेऊन रस्त्यावरील खांब हटविण्याची मागणी केली. निवेदन देताना कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण रहाटे, ग्रा.पं. सदस्य रेखा राऊत, जगदीश प्रधान, मधुकर राऊत, रुमदेव माकडे, अभिमन्यू सहारे उपस्थित होते.