१५७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:08 IST2019-05-01T00:07:40+5:302019-05-01T00:08:28+5:30
चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.

१५७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने रबी व उन्हाळी हंगामात फारशी शेती केली जात नाही. मात्र खरीप हंगामात पाऊस राहत असल्याने सर्वाधिक उत्पादन खरीप हंगामातच घेतले जाते. यावर्षी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीला सुरूवात केली आहे. ज्या शेतकºयांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला, असे शेतकरी आता नवीन कर्जासाठी बँकांकडे अर्ज करीत आहेत. कर्जासाठी कागदपात्रांची जुळवाजुवळ करण्याचे काम सुरू झाले आहे.
चालू खरीप हंगामात १५७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाख, खासगी क्षेत्रातील बँकांना दोन कोटी रुपये व ग्रामीण तसेच जिल्हा सहकारी बँकांना ७७ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे.
शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाही, अशी चुकीची समजूत बँक प्रशासनाची असल्याने बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होत्या. मात्र प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे आता बँकांनी काही प्रमाणात नरमाईचे धोरण अवलंबिले असल्याने शेतकºयांना कर्ज उपलब्ध होत आहे. पीक कर्ज ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे माफ केली जाते.
शेतकºयाला केवळ कर्जाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकरी आता स्वत:हून कर्ज उचलून त्याचा भरणा करीत आहेत.
कर्ज वितरण सुरू
ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला आहे, असे शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत असल्याने त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. एक पाऊस पडल्यानंतर धानाचे पºहे टाकले जातात. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वीच बियाणे, खते यांची तजवीज करून ठेवावी लागते. जमीन सुध्दा नांगरून ठेवावी लागते. यासाठी पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचे अर्ज करण्यास बँकांकडे धाव घेतली आहे.