जिल्हा कार्यालयातून हाेणार ओबीसी महामाेर्चाचे नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:20+5:302021-02-06T05:09:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : ओबीसी समाजबांधवांच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांकरिता २२ फेब्रुवारी राेजी ओबीसी महामाेर्चाचे आयाेजन करण्यात आले ...

जिल्हा कार्यालयातून हाेणार ओबीसी महामाेर्चाचे नियाेजन
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ओबीसी समाजबांधवांच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांकरिता २२ फेब्रुवारी राेजी ओबीसी महामाेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने येथील चामाेर्शी मार्गावरील जुन्या शिवाजी हायस्कूलच्या बाजूला गुरूवारी सायंकाळी ६ वाजता जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अनिल काेठारे, सुरेश पाेरेड्डीवार, रमेश चाैधरी, शेषराव येलेकर, गाेवर्धन चव्हाण, रत्नदीप म्हशाखेत्री, देवानंद कामडी, सतीश विधाते, पंडितराव पुडके, पांडुरंग घाेटेकर, दादाजी चौधरी, अविनाश पाल, राहुल मुनघाटे, लिलाधर भरडकर, रूचित वांढरे, मंगेश लाेंढे, मयूर गावतुरे, दादाजी चापले आदी उपस्थित हाेते.
या जिल्हा कार्यालयातूनच २२ फेब्रुवारी राेजी आयाेजित ओबीसी महामाेर्चाचे संपूर्ण नियाेजन करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालय तसेच तालुकास्तरावरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या सूचना या कार्यालयात करता येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाैरव येनप्रेड्डीवार, संजय घाेटेकर, नंदू वाईलकर, रजनीकांत माेटघरे, सुरेश भांडेकर, अतुल भांडेकर, सुधीर गिरसावळे, सावी धंदरे, आर्या साळवे, प्रियांशी काेठारे, हरिदास काेटरंगे, धीरजा धवरे, राेहित टेंभुर्णे, रवींद्र कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, केशव निंबाेड, महेंद्र ब्राम्हणवाडे आदींनी सहकार्य केले.