लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासन व प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही नर्सेसच्या सेवाविषयक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ ते ७ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत आहे. या आशयाचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना देण्यात आले.नर्सेसचे सेवाविषयक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील नियमित एएनएम/एलएचव्ही, कंत्राटी एएनएम (एनएचएम) सहभागी होत आहेत. नर्सेसच्या विविध मागण्यांमध्ये, आरोग्यसेवक महिलांची रिक्त पदे भरणे, रिक्त पदे भरताना कंत्राटी एनएचएम आरोग्यसेवक महिलांचा प्राधान्याने विचार करावा, त्यांना रिक्त पदे भरताना अग्रक्रम द्यावा, बंधपत्रित आरोग्यसेवक महिलांची सेवा रूजू दिनांकापासून ग्राह्य धरून त्यांना सेवेत कायम करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट ठरवून देण्यात यावे, यात कोणते काम कोणी करावे याचा उल्लेख असावा. एकाच कामाकरिता सर्वांना जबाबदार धरू नये, शिफ्टनुसार कामाचे तास ठरवून द्यावे. केंद्र व उपकेंद्रात आरोग्यसेवक महिलांची अतिरिक्त पदे भरावी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती, जिल्हा मुख्यालय आदी ठिकाणी आरोग्यसेवक महिला व आरोग्य सहायिकांचे पद भरावे, जिल्हा प्रशिक्षण पथकात महिला कर्मचाऱ्यांचे पद नाही. त्या ठिकाणी दोन आरोग्य सहायकाप्रमाणे सहायिकांची स्थायी पदे भरावी. पदोन्नती देताना इतर कॅडर प्रमाणे सेवेत हजर दिनांकापासून पदोन्नती द्यावी, समाजकंटकांपासून संरक्षणासाठी महिला संरक्षणाचा कडक कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देताना संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, सचिव छाया मानकर, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, आशा कोकोडे, शारदा उराडे, विद्या कोल्हेकर, विमल नगराळे, पुष्पा तुरे, मीरा बडोदे हजर होत्या.असे होणार आंदोलनसेवाविषयक मागण्यांसाठी नर्सेसच्या वतीने १ ते ७ सप्टेंबरदम्यान रूग्णसेवा विस्कळीत न करता काळ्याफिती लावून काम करणार. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ८ सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
नर्सेस करणार राज्यभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST
नर्सेसचे सेवाविषयक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील नियमित एएनएम/एलएचव्ही, कंत्राटी एएनएम (एनएचएम) सहभागी होत आहेत. नर्सेसच्या विविध मागण्यांमध्ये, आरोग्यसेवक महिलांची रिक्त पदे भरणे, रिक्त पदे भरताना कंत्राटी एनएचएम आरोग्यसेवक महिलांचा प्राधान्याने विचार करावा, त्यांना रिक्त पदे भरताना अग्रक्रम द्यावा, बंधपत्रित आरोग्यसेवक महिलांची सेवा रूजू दिनांकापासून ग्राह्य धरून त्यांना सेवेत कायम करावे.
नर्सेस करणार राज्यभर आंदोलन
ठळक मुद्देसेवाविषयक मागण्या प्रलंबित : मुख्य कार्यकारी अधिकारी व डीएचओंना निवेदन