जि.प.समोर नर्सेस संघटनेचे उपोषण

By Admin | Updated: July 16, 2014 00:11 IST2014-07-16T00:11:17+5:302014-07-16T00:11:17+5:30

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्नीत जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्यावतीने मंगळवारपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा

Nurses' organization fasting in front of ZP | जि.प.समोर नर्सेस संघटनेचे उपोषण

जि.प.समोर नर्सेस संघटनेचे उपोषण

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्नीत जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्यावतीने मंगळवारपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मंगळवारी पहिल्या दिवशी संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, सचिव निलू वानखेडे, कोषाध्यक्ष बेबी वड्डे, कोषाध्यक्ष रामटेके व शकुंतला वेलादी आदी पाच नर्सेस आमरण उपोषणाला बसले आहेत. नर्सेस संघटनेच्या शिष्टमंडळाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात १०० टक्के नर्सेसना नियमित व स्थायी करण्याचे आदेश देण्यात यावे, एकाच पदावर १२ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या आरोग्य सहाय्यीका व आरोग्य सेविका यांना कालबध्द पदोन्नती देण्यात यावी, नर्सेस कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन ५ तारखेच्या आत देण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करण्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात यावे, एनआरएचएम अंतर्गत मिळणारी वार्षिक देखभाल निधी व बळकटीकरण याकरीता एएनएम व सरपंच यांचा संयुक्त बँक खाते असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे एएनएमच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावी आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. चंपा उईके, माधुरी राळेकर, रूकमा वनसकर, विद्या पाथरडे, शशी वादीकर, संगिता पेशट्टीवार, सुलोचना कुनघाडकर, ज्ञानेश्वरी कोल्हेकर आदी नर्सेसनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे. उपोषणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Nurses' organization fasting in front of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.